मुंबई : शिवाजी पार्कवर ध्वजवंदन आणि संचलन सुरु असताना एका कुटुंबातील 8 जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. हे कुटुंब परभणी येथून आले असून त्यांनी त्यांच्यासोबत रॉकेलही आणले होते. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत आपले पती समशेर खान यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतर संबंधित पोलिसांना अद्यापही निलंबित करण्यात आले नाही. तसेच या प्रकरणी आपल्याला कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही, अशी तक्रार करत समेशर यांची पत्नी अखिला बेगम, समशेर खान यांचे बंधू यासिन खान आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सहा जणांनी शिवाजी पार्कवर आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला होता. काल गुरुवारी या कुटुंबियांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. आज त्यांनी राज्यपालांना देण्यासाठी लिहून आणलेले निवेदनही सोबत आणले होते. या कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी शिवाजी पार्क पोलीस करत आहे.
ध्वजवंदन कार्यक्रमात कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:56
Rating: 5