Breaking News

उडान २०१८ वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात उद्घाटन


श्रीगोंदा/प्रतीनिधी /- विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास अष्टपैलू विद्यार्थी घडणे शक्य असल्याचे वक्तव्य प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास नामवंत व्याख्याते तुकाराम म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रतिभा ताई पाचपुते, परीक्रमाचे सचिव विक्रमसिंह पाचपुते, पोलीस निरीक्षक पडवळ, संदीप नागवडे, दत्तात्रय पाचपुते आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये टीव्ही फेम बाल गायिका गायत्री शिंदे हिने आपल्या मधुर आवाजामध्ये विविध गीते सादर करून रसिकांची मने जिंकली.
यावेळी बोलताना प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के म्हणाले कि, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान व तंत्रज्ञानातील अद्यावत शिक्षण उपलब्ध होणे हि गरज ओळखून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी उचललेले पाउल हे निश्चित समाज उपयोगी आहे. एका व्यक्तीमध्ये अनेक क्षमता असतात परंतु त्या ओळखून विविध क्षेत्रात प्रयत्न पूर्वक पारंगत होऊ शकतो. मनातील न्यूनगंड काढल्यास अविश्वसनीय यश मिळवता येवू शकते हे प्राचार्य म्हस्के यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले

प्रसिध्द व्याख्याते तुकाराम म्हस्के यांनी शिक्षण समाज व संस्कृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले कि, मोठे ध्येय ठेऊन प्रामानिक कष्ट विद्यार्थ्यांनी करावे. अभ्यासाबरोबरच शरीराकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्रामाचे सचिव विक्रमसिंह पाचपुते यांनी केले. या कार्यक्रमासाठी परीक्रमाचे संचालक डॉ.सोमशेखर शायले, प्राचार्य यशवंत वैशंपायन, प्राचार्य निलेश पाटील,प्राचार्य अमोल खेडकर, प्राचार्य मोहन धगाटे, प्राचार्य सोपान राहिंज, प्राचार्य जेम्स मेनन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.श्रीकांत दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन मोहन धगाटे यांनी केले.