Breaking News

नितीश कुमार यांच्या गाडीवर दगडफेक


पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गाडीवर शुक्रवारी दगडफेक केल्याची घटना घडली. बक्सर येथील समीक्षा यात्रेदरम्यान नितीश कुमार यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. नितीश कुमार यांना यातून सुखरुप वाचवण्यात आले. या दगडफेकीत अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. नितीश कुमार यांना सुखरुप वाचवणार्‍या सुरक्षा रक्षक ही किरकोळ जखमी झाली आहेत. काही समाजकंटकांनी नितीश कुमारांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. बक्सर येथील नांदनमध्ये नितीश कुमार गेले होते. यावेळी विकासकामांमुळे नाराज असलेले गावकरी नितीश कुमारांकडे तक्रार करत होते आणि यातूनच वाद झाला. त्यानंतर जमावातील काही जणांनी दगडफेकही केली. दरम्यान, या गोंधळानंतर नितीश कुमार यांना तातडीने घटनास्थळावरुन हलवण्यात आले.