Breaking News

एसीबीकडे दाखल गुन्ह्यातील मजूर संस्थांच्या एमबी केल्या गहाळ


मुंबई शहर इलाखा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता किशोर पाटील मजूर सहकारी संस्थांची देयके मंजूर करून अदा करण्यासाठी लाच मागत असल्याप्रकरणी त्यांच्याविरूध्द तक्रार दाखल आहे, एसीबीने गुन्हा रजि.नंबर 18/13 अन्वये दाखल केलेल्या गुन्ह्याशी संबंधित एमबी(मोजमाप पुस्तिका) मजूर संस्थांनी पाटील यांच्यानंतर शहर इलाखा विभागाचा पदभार सांभाळत असलेले कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांच्या स्वाधीन केल्या होत्या, या सर्व 18/13 शी संबंधित असलेल्या एमबी सध्या शहर इलाखा साबां विभागाच्या दप्तरात सापडत नसल्याने या विभागाचा गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या एमबी एसीबीच्या तपासासाठी आवश्यक असल्याने तसेच पाटील यांच्या लाचखोरीमुळे मजूर संस्थांची प्रलंबित देयके प्रदान करण्यासाठी गरजेच्या असल्याने हे एमबी गहाळ प्रकरण डोकेदुखी ठरले आहे. या एमबी गहाळ करण्यात शहर इलाखा शाखेच्या बहुचर्चित कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांचा सहभाग असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. दि.10 आक्टोबर 2017 रोजी रात्री दीड वाजता प्रज्ञा वाळके यांनी शहर इलाखा विभागाच्या कार्यालयातून काही सामान इतरत्र हलविले त्यात या मजूर संस्थांनी केलेल्या कामाची नोंद असलेल्या मोजमाप पुस्तिकाही कार्यालयाच्या बाहेर नेऊन गहाळ केल्याचा संशय प्रज्ञा वाळके यांच्यावर व्यक्त केला जातो आहे.