Breaking News

मुन्ना यादव प्रकरणी नागपूर पोलीस हतबल


नागपूर : भाजप नेता आणि इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळचा अध्यक्ष मुन्ना यादवच्या प्रकरणात वारंवार टीकेचे धनी ठरणार्‍या नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान केले. मुन्ना यादवच्या मारहाणीच्या प्रकरणाला 3 महिने उलटल्यानंतरही त्याला अटक करण्यात नागपूर पोलीस अपयशी का, असा प्रश्‍न विचारल्यानंतर नागपूरचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी ‘तो आमच्यापेक्षा जास्त फास्ट’ असल्याचे विधान केले. आम्ही फरार आरोपींचा नेहमीच शोध घेत असतो. मुन्ना यादवचाही शोध घेत आहोत. मात्र, तो मिळत नाही. आमच्यावर कोणताच राजकीय दबावही नाही, असेही बोडखे म्हणाले.