मुकबधीर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
सुनीता पालवे (खेडकर ) या स्वतः दिव्यांग असून त्यांना दिव्यांग मुलांबद्दल विशेष आत्मियता आहे. त्या वेळोवेळी विद्यालयातील मुकबधीर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असे कार्यक्रम राबवून या वंचित विद्यार्थ्यांचे आश्रू पुसून त्यांना आनंदी मनाने जगण्यासाठी बळ देत असतात. त्यांचे विविध उपक्रम विद्यालयातील दिव्यांग विदयार्थ्यांसाठी औत्सुक्याचा विषय असतो.
अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेतून त्यांनी मुलींसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धा आयोजित केली व या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मार्गदर्शक नंदकुमार डाळींबकर, विद्यालयाचे मुख्याध्यपक प्रदीप भोसले, स्मृती खेडकर, श्रेया खेडकर, सोनी शिरसाट व सर्व कर्मचारी उपस्थित होते
