Breaking News

पारनेर बाजार समितीत तूर खरेदी केन्द्र मंजुर:.गायकवाड

पारनेर/प्रतिनिधी /- ऩाफेड तर्फे शासकिय आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदी केंन्द्र सुरु करणार असल्याची माहीती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.शासनाच्या किंमत खरेदी योजने अंतर्गत शासनाने तुरीला प्रति क्विंटल पाच हजार चारशे पन्नास रुपये किंमत जाहीर केली आहे. शेतक-यांनी तुरीच्या विक्रीसाठी गुरुवार पासुन ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. 


यासाठी शेतक-यांनी तुरीची नोंद असलेला सात बारा व आठ अ उतारा, आधारकार्ड ,राष्ट्रियकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आणी मोबाईल क्रमांक द्यावेत. नोंदणी नंतर मालाच्या खरेदी साठी शेतक-यांना मेसेज पाठवण्यात येतील. शेतमाल विक्रिसाठी आणताना तो काडी कचरा ,माती व मुकणी विरहीत असावा. नाफेडच्या ग्रेडरने स्विकारलेल्या शेतमालाची खरेदी केली जाईल. तसेच शेतमाला साठी शेतमाल तारण कर्ज योजना सहा टक्के दराने सुरु असुन त्याचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव शिवाजी पानसरे यांनी केले आहे.