अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर नगरपरिषद करणार दंडात्मक कारवाई
स्वच्छ सर्वेक्षनातंर्गत नगरपरिषद सर्वत्र स्वच्छता करत आहेत. व त्यासाठी शहरातील नागरिक चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे. परंतु काही भागात नागरिक रस्तावर व इतरत्र कचरा टाकणे, रस्त्यावर सडा फवारणे, तसेच तोटी नसल्यामुळे सर्व पाणी वाहताना निदर्शनात आपले असल्याने मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी असलेल्या ५ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथक ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडी मध्ये टाकण्यात येतो की नाही याची तपासणी करणार आहे. तसेच सकाळी ६. ३० ते १०. व सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत रस्त्यावर कचरा टाकणे, अनावश्यक पाणी सोडणे याबाबत त्वरित दंडात्मक कारवाई करणे बाबत सूचना या पथकाला दिली आहे.
नागरिकांना कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकू नये, आपल्या नळाला तोटी नसल्यास त्वरित बसवून घ्यावी, ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करूनच तो घंटागाडीतच टाकावा आणि नगपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.