स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात आणि डॉ. शिंदे यांच्यामुळे समृद्धी : कांबळे
मालपाणी लॉन्स येथे झालेल्या स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री विनायकराव पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. सुधीरकुमार गोयल, ज्येष्ठ पत्रकार मधूकरराव भावे, पंडीत थोरात, डॉ. राजीव शिंदे, उल्हास लाटकर, विजय बोर्हाडे, प्रेमानंद रुपवते, कांचन थोरात, बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, कल्याण काळे, किरण डोनंगावकर, दादापाटील शेळके, शोभा कडू, सत्यजित तांबे, शरयू देशमुख, अॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, राजवर्धन थोरात, इंद्रजीत थोरात, शिवाजीराव थोरात, निशा कोकणे, लक्ष्मणराव कुटे, रामदास वाघ, संपतराव म्हस्के, अमित पंडीत, डॉ. हर्षल तांबे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणा-या व्यक्तींसाठीचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व १ लाख रुपये रोख रक्कम उत्तम कांबळे यांना व कृषी, शिक्षण, संशोधन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणा-या व्यक्तींसाठीचा डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार व १ लाख रुपये रोख रक्कम डॉ. सुधीर कुमार गोयल यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार गणपतराव सांगळे यांना स्मृती चिन्ह व ५१ हजार रुपयांची रोख रक्कम या पुरस्काराने यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन अॅड. माधवराव कानवडे यांनी आभार मानले.
