कोपरगाव पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शेळके
कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघटनेची बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या शाखा प्रत्येक तालुक्यात आहेत. राज्यात कुठेही पत्रकार बांधवांना काहीही अडचणी आल्यास संघटनेचे पदादिकारी यांची मदत होते .
संघटनेच्यावतीने आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय मेळावे घेतले आहेत. तसेच वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. दरम्यान, लक्ष्मण जावळे यांची संघटनेच्या सचिवपदी तर खजिनदारपदी हेमचंद्र भवर यांची निवड करण्यात आली. अन्य संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये रविंद्र साबळे, संजय लाड, निवृत्ती शिंदे, शमीम शेख आदींचा समावेश आहे. बैठकीस शिवाजी गायकवाड, पंडित भारूड, माणिकराव उगले, अरुण आहेर, नानासाहेब मोरे, शिवाजी जाधव, गहिनीनाथ गुले, जलिल अत्तार, राजेंद्र तासकर, विनोद जवरे, काकासाहेब खर्डे आदींसह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
