Breaking News

बाबूजी आव्हाड महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपन्न.


पाथर्डी/ शहर प्रतिनिधी/- येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व पुणे येथील द युनिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत द युनिक अकॅडमीचे प्रा सुनील देशमुख व प्रा विपुल वाघमोडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ एस बी चव्हाण, स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा किरण गुलदगड, डॉ सुभाष शेकडे, डॉ अजय पालवे, प्रा वैशाली आहेर, प्रा मन्सूर शेख, सैंदाने सर उपस्थित होते.
प्रा सुनिल देशमुख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ग्रामीण भागातील यशस्वी झालेल्या विविध विद्यार्थ्यांची यशोगाथा सांगून प्रेरित केले. ते म्हणाले महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षेबाबत जागृती निर्माण झाली नसून अभ्यासाचे नियोजन, संधी,आणि अभ्यासाची योग्य आखणी या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांनाही हि परीक्षा उत्तीर्ण होणे सहज शक्य आहे. अधिकारी झालेले बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातीलच असून त्यांना योग्य दिशा मिळल्यास ते कोणतेही यशोशिखर नक्कीच गाठू शकतात. आपल्या व्यक्तित्वाची पडताळणी करून नक्की काय करायचे ते ठरवूनच मग या परीक्षांची तयारी करणे उत्तम ठरते.

प्रा विपुल वाघमोडे यांनी विविध स्पर्धा परीक्षांची विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा वैशाली आहेर यांनी, सूत्रसंचालन प्रा मन्सूर शेख यांनी तर आभार प्रा किरण गुलदगड यांनी मानले.