केंद्र, राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवा - सुभाष पारधी
नाशिक, दि. 27, जानेवारी - केंद्र आणि राज्य शासनाच्या कर जनता खुष असून या दोन्ही सरकारांनी घेतलेल्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यत पोहोचवा असे आवाहन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांनी केले.
अनुसूचित जाती मोर्चा तर्फे नाशकात भाजपा मुख्यालय वसंतस्मृती येथे आयोजित महानगर कार्यकारीणी बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून पारधी बोलत होते. व्यासपिठावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, आ.बाळासाहेब सानप, अनुसूचित मोर्चाचे प्रदेश महासचिव अशोक कानडे आदी होते.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाची जबाबदारी मोठी राहणार असून त्यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरु करावी आणि घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे महत्व लोकांना पटवून दयावे असे आ.बाळासाहेब सानप यांनी आपल्या भाषणांत सांगितले. प्रास्ताविक अनुसूचित मोर्चाचे महानगर अध्यक्ष संजय गालफाडे यांनी केले.