Breaking News

कुडाळ हायस्कुलचा नेत्रदीपक प्रजासत्ताक दिन सोहळा

सिंधुदुर्गनगरी, दि. 27, जानेवारी - प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सादर झालेल्या विविध कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारण फेडले. या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ सिने कलाकार मोहन आगाशे यांच्यासह अमेरिकेतून आलेल्या 18 पाहुण्यांनी या कार्यक्रमाच विशेष कौतुक केले.


स्वतंत्र भारताच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रम सादर होत असतात. गेली 8 वर्ष कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कुडाळ हायस्कूल, इंग्रजी माध्यमाची शाळा, संत राउळ महाराज महाविद्यालय आणि बागवे आयटी इंस्टीटयूट यामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सुद्धा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनी रंगारंग कार्यक्रम सदर करत आहेत. 69 व्या प्रजासत्ताक दिनी या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केल. कुडाळ हायस्कूलच्या मैदानवर आकर्षक शा मियाना उभारून आणि रांगोळ्या रेखाटून वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. शाळा आणि महाविद्यालयातले हजारो विद्यार्थी मैदानावर उपस्थित होते. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सुरेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर चव्हाण यांनी संचालनात सहभागी झालेल्या पथकांची पाहणी केली. संगीत शिक्षक राजन माडये यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत बँडच्या तालावर या नऊ पथकांनी शानदार संचलन करत मान्यवरांना सलामी दिली. या पथकामध्ये एनसीसी वरिष्ठ आणि कनिष्ठ पथक, इंग्रजी शाळा, पर्यावरण रक्षण मुलींचे पथक, एनएसएस पथक, कुडाळ हायस्कूलच आर एस पी पथक, स्काउट आणि गाईड पथक सहभागी झाली होती. बंडच्या तालावर आकर्षक संचलन करून या पथकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. बँड पथकात हर्षवर्धन जोशी, प्रतिक राणे, जयतीर्थ राउळ, ऋषिकेश जाधव, स्वराज ओटवणेकर सहभागी झाले होते. या निमित्ताने कुडाळ हायस्कू लची विद्यार्थिनी सानिका प्रसाद कुंटे हिने राज्य नाट्य स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल आणि संत राउळ महाराज महाविद्यालयाचा विद्यार्थी विठ्ठल तळवलकर याचा सांस्कृतिक क्षेत्रतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरेश चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संचलन आणि मानवंदना झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सदर केले. यात महाराष्ट्राची परंपरा दाखवणारा कार्यक्रम, मुलींचे लेझीम पथक, पर्यावरण रक्षक पथकाची सायलेंट ड्रील असा कार्यक्रमांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. भूषण बाक्रे आणि मो निषा तेरसे यानी याकार्यक्रमाची कोरिओग्राफी केली होती. तर मनीषा कुबल, आर.पी. देसाई आणि पी.पी. ठाकूर आणि सहकार्‍यांनी यासाठी सहाय्य केल होते. यात सर्वांच्या आकर्षणाच केंद्र ठरल ते संत राउळ महाराज महाविद्यालयाच कमांडो ट्रेनिंग पथक. मोटरसायकल कसरती, कमांडो ट्रेनिंगची झलक, अतिरेक्यांच्या तावडीतून मुलांची सुटका, विविध चित्तथरारक कसरती यांना उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचान प्रा. अर्शद आवटे सर यांनी हिंदीतून तर गुरबे सर यांनी इंग्रजीतून केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सिने अभिनेता मोहन आगाशे यांच्या बरोबरच अमे रिकास्थित डॉ. अनिल नेरूरकर आणि त्यांचे अमेरिकेतील 18 सहकारी आवर्जून उपस्थित होते. या सर्वांनी या संपूर्ण कार्यक्रमाच कौतुक केल. या शिवाय कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.