वाघा बॉर्डर ते दिल्ली सायकल रॅली द्वारे नाशिक सायकलिस्ट्स देणार प्रदूषण रोखण्यासाठी संदेश
नाशिक, दि. 27, जानेवारी - नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून सायकल्रचार व प्रसार करून त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन प्रयत्न करत असते. त्याच अनुषंगाने आता सायकलिस्ट्सच्या काही सदस्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वाघा बॉर्डर ते दिल्ली अशी 571 किमीची सायकल रॅली काढत प्रदूषण मुक्त भारतासाठी सायकल चालवा असा संदेश देणार आहेत.
या रॅलीत नाशिकचे सहा सदस्य प्रितेश पाटील, रविंद्र दुसाने, डॉ. भुषण भुरे, शुभम देवरे, ज्ञानेश सोनवणे, प्रेरित लोहारकर हे सहभागी झाले आहेत. राष्ट्रहितासाठी प्रदूषणमुक्त देश असा संदेश देत वाघा बॉर्डर ते दिल्ली अशी राईड करणार आहेत. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी 571 किमीची ही राईड अमृतसरपासून वाघा बॉर्डर तेथून पुन्हा अमृतसर - लुधियाना - कुरुक्षेत्र - दिल्ली - इंडिया गेट अशी असणार आहे. 29 जानेवारी रोजी सर्व सायकलिस्ट्स इंडिया गेटला पोहचणार आहेत.