पुणे : हिंजवडी येथील माणगाव जवळ सोमवारी पहाटे एका टेम्पो ट्रॅव्हलरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औंध रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मंगेश मुरलीधर कणसे (वय 25, मूळ रा, लिंब सातारा) संभाजी बिराप्पा गराळे (वय 25, मूळ राहणार जत, सांगली) हे दोघे पिरंगुट येथे एका कंपनीत कामाला होते. आज पहाटे ते माणगावातून गोठवडे येथे दुचाकीवरून जात होते. यावेळी एका टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.
टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:19
Rating: 5