Breaking News

माजी लोकप्रतिनिधीनी स्वता:ची घरे भरली --आ. बाळासाहेब मुरकुटे


भेन्डा/प्रतिनिधी /--नेवासा तालुक्यातील शनी -गोंडेगाव येथे आमदार बाळासाहेब मुरकुंटे यांच्य विकासनिधीतुन बांधण्यात येत असलेल्या हनुमान मंदिराच्या सभामंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार बाळासाहेब मुरकुंटे बोलत  होते .
याप्रसंगी गोडेगावचे सरपंच गावाजी आढागळे ;जी प सदस्य दत्तुभाऊ काळे ;पंचायत समिती सदस्य आजीत मुरकुंटे; कोठूळे महाराज,भाऊसाहेब फुलारी ;भाजपा तालुका उपाध्यक्ष अण्णा गव्हाणे , शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष 

अंबा दास कोरडे , बाबासाहेब रोड्गे,सेजुळ ,शाखा अभियंता शेळके, गोंधळ नाट्य कलाकार बाबासाहेब गोंधळी आदी नागरिक हजर होते. 

या प्रसंगीं बोलताना आमदार मुरकुंटे म्हनाले की माजी लोकप्रतिनिधीच्या चुकीमुळे जळके गावाचा सभामंडप निधी मागे गेला, गोंडेगावला जाणीवपूर्वक विकास होऊन दिला नाही. यांचीच जाणीव ठेऊन मी कोणताही निधी कमी पडू देणार नाही. अशी हमीच आमदार मुरकुटेंनी दिली. माजी लोकप्रतिनिधीनी पवित्र शनीदेवाच्या तिजोरीवर हात साफ केल्यामुळे ते प्रायचित्त भोगत आहेत असे तें म्हणाले.