जामखेड - लाखो लोकांनी केलेल्या त्यागातून देश उभा राहिला आहे. या देशाला बलशाली, समृध्दशाली बनवण्यासाठी तरूणांनी त्याग वृत्तीचा अंगीकार करावा असा मौलिक सल्ला देत देशात सध्या सुरू असलेल्या जातीवादामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती चिंताजनक असुन आम्ही देशाला स्वतंत्र करण्यासाठी का लढलो? असा प्रश्न सातत्याने सतावत असल्याची खंत स्वातंत्र्य सैनिक शेखलाल शेख यांनी व्यक्त केली. वयाचे शतक पार करणार्या स्वातंत्र्य सैनिकाने व्यक्त केलेल्या वरिल भावना समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणार्या आहेत. जामखेड येथील स्वातंत्र्य सैनिक शेखलाल शेख हे आज आयुष्याची शंभरी पार करत आहेत. या पार्श्वभूमीवर शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधत स्वातंत्र्य चळवळीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. आज विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे.
देशाला बलशाली बनवण्यासाठी त्यागाची गरज ः ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक शेख
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:40
Rating: 5