सोनई हत्याकांड : न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या निर्णयाचे स्वागत - रामदास आठवले

मुंबई, दि. 21, जानेवारी - अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील तिघा दलित तरुणांच्या हत्याकांड प्रकरणी सर्व सहा आरोपींना न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा योग्य आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त व्यक्त केले. 


कोपर्डी हत्याकांड प्रकरणीही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्या निर्णयचेही समाजात स्वागत झाले आहे. सर्वच समाज घटकांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच सोनई हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे. पीडितांना न्याय मिळाला आहे. सोनई हत्याकांड प्रकरणी आपण आधीपासूनच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्‍वास दृढ करणारा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे ऑनरकीलिंग करणार्‍या प्रवृत्तींना जरब बसेल, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.