Breaking News

कुरूडगावात विविध विकास कामाचा शुभारंभ


शेवगाव तालुक्यातील कुरूडगाव ( रावतळे) ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले यांचे हस्ते करण्यात आले. चौदा वित्तीय आयोग आणि दलित सुधार योजनेंतर्गत गावातील गौतमनगर येथे अंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरण रस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग खोल्या दुरूस्ती तसेच सुरक्षा भिंत (वॉल कंपाऊंड) शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये एल. ई. डी संच बसवणे तसेच दलित सुधार योजनेंतर्गत सिध्दार्थनगर भागामध्ये भुमिगत बंदिस्त गटार इत्यादी ग्रामसुधार कामांचा शुभारंभ सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, यावेळी पं. समिती उपसभापती शिवाजी नेमाने, एरंडगाव गण पं. समिती सदस्य मंगेश थोरात, सरपंच जालिंदर काळे, रावसाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.