Breaking News

चर्चासत्रासह रक्तदान शिबीर संपन्न

तालुका केमिस्ट असोसिएशन व आनंद कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकल व्यवसाय विषयावरील चर्चासत्र रक्तदान शिबीर नुकतेच संपन्न झाले, तर रक्तदान शिबिरातून 35 रक्त पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक नामदेव लबडे, उमेश मोरगावकर, आनंद महाविद्यालयाचे भगत, सुधाकर बोरुडे,फारूक शेख,मिलिंद क्षीरसागर, शेवगाव केमिस्ट असोशिशनचे अध्यक्ष सुरज लांडे, अहमदनगर रक्त पेढीचे डॉ. राजेंद्र पवार, प्रा. राठोड, प्रा. गारूड, प्रा. महाजन, शिवाजी जरांगे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी मनसेचे संतोष जिरेसाळ, प्रकाश पालवे, संदीप लोखंडे, वैभव गर्जे, बब्बू सय्यद, परवेज पठाण, ज्ञानेश्‍वर शिरसाठ, निलेश मंत्री, मुन्ना जाजू, गणेश बाहेती, चंदन कुचेरिया, अशोक गांधी, साकेगावचे सरपंच आप्पासाहेब सातपुते आदींसह आनंद महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गांधी सूत्रसंचालन विश्‍वजीत गुगळे तर आभार प्रदर्शन चंदन कुचेरिया यांनी केले.