Breaking News

श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा लवकरच : आ. कांबळे


श्रीरामपूर प्रतिनिधी - येथे जिल्हा वाहतूक शाखेनंतर आता लवकरच विजेचे भारनियमन टाळण्यासाठी वीज उपकेंद्र व महावितरणचे मुख्यालय उभारण्यात येणार आहे. त्याबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांचेबरोबर नुकतीच चर्चा झाली. त्याचबरोबर श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणाही लवकरच होईल, असे प्रतिपादन आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केली. 
श्रीरामपूर येथे जिल्हा वाहतूक शाखेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. श्रीरामपूर येथील जुने तहसील कार्यालय येथे जिल्हा वाहतूक श्रीरामपूर शाखेचे उदघाटन आ. कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे, सभापती दीपक पटारे, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे आदींच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, स्नेहलता खोरे, नागेश सावंत, प्रकाश ढोकणे, समन्वय अधिकारी शौकत शेख, महेंद्र त्रिभुवन, रमण मुथा, सुनील मुथा, प्रकाश कुलथे, पद्माकर शिंपी, कैलास आगे, विष्णू वाघ, रमेश कोठारी, शिवाजी पवार, शामलिंग शिंदे, मुख्तार शहा, कांजीशेठ टाक, मधुकर माळवे, मुकुंद बोडखे, प्राचार्या ठोकळ, महेश रोकडे आदी उपस्थित होते. पो. कॉ. शेख यांनी आभार मानले.