टेंभुर्णी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी; परिवर्तन समितीची मागणी
या निवेदनावर सर्वश्री तिलक डुंगरवाल, अमोल सावंत, विकास डेंगळे, यशवंत जेठे आदींच्या सह्या आहेत. यात म्हटले आहे, की लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात असलेल्या टेंभुर्णी येथे १२ वीत शिक्षण घेत असलेली कोमल पवार या युवतीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्त्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करून तो खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. नराधमांना फाशीची शिक्षा देणेकामी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची योग्य काळजी घेऊन आरोपींविरुद्ध लवकरात लवकर चार्जशीट {आरोपांतर} दाखल करण्यात यावे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. या प्रकरणात आजपर्यंत आरोपीना अटक का करण्यात आली नाही, याची चौकशी करून यात हितसबंध असलेल्या अधिकाऱ्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी.
