Breaking News

एड्युफेअरने मिळाली विज्ञानदृष्टी; विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जळगाव,  जळगाव येथील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणितावर आधारीत ‘एड्युफेअर-2018’ मधून अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानदृष्टी मिळत आहे. ‘घडवू या मनोरंजनासह शिक्षणाची सफर’ या संकल्पनेवर आधारीत उपक्रम पालक, शिक्षकांसह विद्यार्थ्यांना भावला असून दुसर्‍या दिवशी एड्युफेअरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज संघपती सेवादास दलिचंदजी जैन, माजीमंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योगसमूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह शहरातील मान्यवरांनी एड्युफेअरला भेट देवुन विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांचे कौतूक केले.


वेताळाची गुफा आणि शिक्षण व्यवस्थेतील ज्वलंत प्रश्‍नांवर प्रकाश टाकणार्‍या ‘मुलं देवा घरची फुलं, झपाटलेली चाळ’ या नाटिकांना उदंड प्रतिसाद लाभला. यासह बुद्धिमत्तेला गुणवत्तेसह चालना देणारे 70 हून अधिक खेळ बालगोपाळांसाठी एड्युफेअर शैक्षणिक मेळाव्यात आहेत. यातील स्नोवर्ल्ड, मार्बल रन आणि फॅन्सी लॅण्डने मुलांना अधिक आक र्षित केले. विद्यार्थ्यांनी स्वतः लिहलेल्या छोट्या भिमच्या स्टोरीतून सकारात्मक दृष्टीकोन कसा बाळगावा याबाबत संदेश देण्यात आला. पपेट शोच्या धमाल मनोरंजनासोबत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांची प्रचती अन्य विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांना झाली. ‘खेळता- खेळता शिका व शिकता-शिकता खेळा’ या संकल्पनेवरील जादूचे प्रयोग, फुलांच्या दुनियाची सफर करतांना प्रत्येक जण अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते. मुलांनी साकारलेल्या 50 पेक्षा अधिक हस्तकला आणि चटकदार खाऊगल्लीला जळगावकरांनी विशेष पसंती दिली. एड्युफेअरमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांना मनोरंजनाची धमाल मेजवानीच मिळत आहे. पालकांसह शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नव क ल्पनांना वाव देण्यासाठी एड्युफेअरला भेट द्यावी, असे आवाहन अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका निशा जैन व प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले.