स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या सरावात गुंतले विद्यार्थी
कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शनिवारी (दि.१३) होत आहे.दुपारी १ वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुणे येथील पर्यावरण तज्ञ व राजकीय विश्लेषक डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संस्थेचे सचिव मकरंद सप्तर्षी,एन.बी.जाधव,जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक भोसले,ज्योतीराम मोरे,पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे.कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य चंद्रकांत मोरे यांनी केले आहे.
सध्या विविध शाळातील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सरावात गुंतले आहेत.सर्वच शाळांत स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.जिल्हा परिषद,इंग्लिश मिडिअम तसेच महाविद्यालययीन विद्यार्थी तसेच शिक्षक या कामात गुंतल्याचे चित्र आहे.विविध सामाजिक विषय घेवुन विद्यार्थी नाटक,एकांकिका,मुकअभिनय आदींचा सराव करीत आहेत.कार्यक्रमासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी विद्यार्थी धडपडत आहेत.या कालावधीत शिक्षण विभाग,राजकीय नेते तसेच मान्यवरांच्या तारखा दिवसागणिक बुक होत आहेत.
