Breaking News

जळगाव बस स्थानकाचा विकास करणार - गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 10, जानेवारी - जळगाव बस स्थानकाच्या 12 कोटींच्या विकासाचा विषय येणार्‍या बजेटमध्ये असेल, याबाबतचा प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात आहे. ज्याप्रमाणे जळगाव विमानतळाचा विकास झाला त्याचप्रमाणे बस स्थानकाचा देखील विकास होईल, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य मार्ग प रिवहन महामंडळ गणवेश वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आ. सुरेश भोळे, चेतना खिरवाडकर, प्रशांत वासकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मागील एस.टी.आणि आत्ताची एस.टी यातील तुलना केली तर खूप बदल झालेला दिसून येतो. आता तर गणवेशदेखील बदलले आहेत. गेल्या तीन वर्षात सुरू वातीला गणवेशदेखील मिळाले नव्हते. आले तर अपूर्ण साहित्य उपलब्ध होत होते. मात्र यंदा संपूर्ण गणवेश देण्यात येत आहेत. बस तसेच स्थानकातील परिसर यांची देखिल उत्तम स्वच्छता होते आहे.
जळगावच्या बस स्थानकाचेदेखील 12 कोटींच्या प्रस्तावाचा समावेश बजेटमध्ये असणार आहे. जळगाव पुणे 45 खासगी बसेस जातात. यामुळे आता आपण खासगीपेक्षादेखील चांगली सेवा प्रवाशांना देऊ शकतो. चांगल्या बसेस देण्याची गरज आहे. खासगी प्रवासाचे भाडे हे सट्टया प्रमाणे असते, ते कमी जास्त होत असते. मात्र एस.टीचे भाडे हे फिक्स असते. यामुळे आता खासगीपेक्षा चांगली सेवा देण्याचा दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. गणवेशामुळे प्रवाशांवर एक वेगळी छाप पडते. असेही ना.पाटील यांनी बोलतांना सांगितले.