दखल - दंगलीनंतर भाजप आणखी घाट्यात
जिग्नेष मेवाणी या तरुणाला काँग्रेसनं सोबत घेतलं. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. मेवाणी स्वत: आमदार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात कडवी टीका केल्यानं तो आता चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्रात गुन्हे दाखल झाले. तसंच नक्षलवाद्यांसोबत हातमिळवणी करून दंगल भडकवली जात असल्याचा आरोप त्याच्यावर झाल्यानं आता दलितांना आणखी एकत्र येण्याची संधीच भाजपनं उपलब्ध करून दिली आहे. कोरेगाव भीमाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपवर दलितविरोधी असा शिक्का मारत काँगे्रसनं भाजपकडं वळलेली मतं पुन्हा आपल्याकडं वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून संसदेत काँगे्रसनं आक्रमक भूमिका घेतली.
मोदी जातीय दंगली किंवा पुरोगामी नेत्यांच्या हत्यांवर कधीच लवकर भाष्य करीत नाहीत. त्याचाच आधार घेऊन कोरेगाव भीमाच्या दंगल प्रकरणात मोदी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं के ला; परंतु त्यावर नेहमीप्रमाणं मोदी यांचं मौन सुटलं नाही. गुजरातमध्ये उनाच्या घटनेनंतर दलित समाजात संतप्त पˆतिक्रिया उमटली होती. तरीही उत्तर प्रदेशात द लितांची मतं मोठ्या पˆमाणावर मिळविण्यात भाजपला यश आलं. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. रोहित वेमुल्ला, उना आणि भीमा कोरेगाव या तिन्ही पˆक रणांची सांगड घालत काँगˆेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप दलितविरोधी असल्याचा आरोप केला. लोकसभेत काँगˆेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही भाजपवर दलितविरोधी असा हल्ला चढवीत दलितांवर हल्ले झाल्यावर मोदी हे मौनीबाबाच्या भूमिकेत असतात, असा आरोप केला. भीमा क ोरेगावच्या घटनेवरून काँगˆेसनं भाजपला कोंडीत पकडण्याचा पˆयत्न केला आहे. भाजपलाही या मुद्दयावर बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. भाजप सरकारच्या विविध धोरणांमुळं मुस्लीम समाजात नाराजी असून, पुढील निवडणुकीत या समाजाची मतं मिळतील, असा काँगˆेस नेत्यांना विश्वास आहे.
मुस्लिमांबरोबरच दलित समाजाची जोड मिळावी, असा काँगˆेसचा पˆयत्न आहे. त्यातूनच काँगˆेसनं कोरेगाव भीमा पˆकरणावरून भाजपला दोष देण्याचा पˆयत्न केला आहे.कोरेगाव-भीमामधील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या निमित्तानं दलित संघटना एकत्र आल्या असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले व रामविलास पासवान यांनी सरकारधार्जिणी भूमिका घेतल्यानं त्याबाबती ची तीवˆ नाराजीची भावना दलित युवकांनी बोलून दाखविली. काही दलित संघटनांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधातील संघर्ष अधिक तीवˆ करण्याचा इशारा दिला आहे. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदुत्त्ववादी संघटनेचे मि लिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सरकार त्यांना पाठीश्ी घालत असल्याचा आरोप होत आहे. एकीकडं ही स्थिती असताना भिडे गुरूजींना अटक करू नये, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी हिंदुत्त्ववादी संघटना मोर्चे काढून सरकारवर दबाव आणीत आहेत. दलित संघटना व दलित नागरिकांमध्ये भिडे व एकबोटे यांच्याविरोधात तीवˆ रोष आहे. असं असूनही सरकारनं त्यांना अटक करण्याबाबत पावलं उचलली नसल्याबाबतही दिवसभर संताप व्यक्त क रण्यात येत होता.
भारिप बहुजन पक्षाचे नेते अॅड. पˆकाश आंबेडकर यांनी या दोघांविरोधात याकूब मेननपˆमाणे कारवाई क रण्याची मागणी केली आहे. दुसरीकडं मायावती यांनीही कोरेगाव भीमाच्या दंगलप्रकरणात भाजपवर खापर फोडलं आहे. कोरेगाव भीमाच्या हिंसेनंतर हे प्रकरण दलित विरुद्ध मराठा असल्याचं चित्र जाणीवपूर्वक निर्माण केलं जात होतं, हे षडयंत्र मात्र यशस्वी झालं नाही. हा हल्ला केवळ दलितांवरचाच नाही, तर बहुजनांवर झालेलं आक्रमण असल्याचं अॅड. प्रकाश आंबेडकर मानतात. त्याअगोदर शरद पवार यांनीही हीच भूमिका घेतली होती. राज्यात मराठा क्रांती मोर्चा सुरू झाल्यानंतर मराठा आणि दलित समाजात क टुता आली होती. ही कटुता कमी व्हावी, यासाठी मी वेळोवेळी पˆयत्न झाले; परंतु त्यात यश मिळत नव्हते. कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या दोनशेव्या दिनानिमित्तानं अॅड. आंबेडकर यांनी हा संवाद पुन्हा सुरू केला. संभाजी महाराज आणि गोविंद गायकवाडांच्या दुव्याने दलित मराठा जवळ आले. दलित आणि मराठा संघटनांमध्ये पूर्णपणे खुंटलेला संवाद पुन्हा सुरू होणं हे चांगलं चिन्ह आहे. या घटनेचा राजकीय फायदा व्हावा यासाठी भाजपनं पˆयत्न केला; पण त्यांनाही त्याचा फायदा होणार नाही. भिडे आणि एक बोटे यांना अटक झाली नाही, तर त्यांना मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे.
