आपले वर्चस्व टिकविण्यासाठी शालेय जीवनापासून शिकले पाहिजे: डॉ झरकर
मिरजगाव येथील भारत विद्यालयाच्या हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विद्यालयाचे स्कुल कमिटीचे चेअरमन डॉ रमेश झरकर अध्यक्ष पदी तर प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपा चे जेष्ठ नेते हरीदास केदारी, उपस्थित होते, यावेळी उदघाटन प्रसंगी डॉ झरकर म्हणाले जीवनामध्ये आपले अस्तित्व टिकवायाच असेल तर विद्यार्थी जीवनापासुनच खेळांना महत्व दिले पाहीजे. आपल्या आवडीच्या खेळामध्ये करीअर केले पाहीजे. जो खेळाडु प्रवृत्ति लक्षात घेऊन तो कधीही हार-जीतचा विचार कधीच न करता मनापासुन खेळतो. तो भविष्यात सर्वात मोठा खेळाडु तयार होतो, असेही डॉ झरकर म्हणाले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भा. ए.चव्हाण, क्रीडाशिक्षक सतिष फरताडे, जेष्ट शिक्षक शरद दळवी, किशोर खुरांगे, राजेंन्द्र नवले, जयश्री ठोकळ, सुनिता कुलकर्णी, भाऊसाहेब वाडगे, गौतम रसाळ, प्रसाद सामलेटी, कल्याण गवारे,दादा शिगांडे, आदि शिक्षक यावेळी उपस्थित होते, यावेळी विद्यार्थी विद्यार्थींनीनी खेळाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. तीन दिवसीय चालणाऱ्या हिवाळी स्पर्धा ऊदघाटन प्रसंगी शालेय विद्यार्थी विद्यार्थींनीने आपले मनोगत व्यक्त करते वेळी म्हणाले की आपण शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच खेळामध्ये प्रविण्य मिळवावे खेळामुळे शरीर, सुख समाधान व आरोग्य व्यवस्थित राहण्याची ताकद आपल्याला मिळते. या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मशाल प्रज्वलित करून सामन्याला सुरवात करऩ्यात आली.
