सुरक्षेच्या कारणातून केजरीवालांच्या सभेला परवानगी नाकारली
बुलडाणा, जिजा मातेच्या जयंती निमित्ताने 12 जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंधखेड-राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा होणार होती. परंतु, पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. राज्यातील परिस्थीती पाहता सुरक्षेच्या कारणातून ही परवानगी नाकारण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अ धिकारी बी.एन. नलावडे यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीने जिजा मातेचे जन्मस्थान असलेल्या सिंधखेड-राजा येथील श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात 12 जानेवारी रोजी सभेचे आयोजन केले होते. त्यासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र व इतर गोष्टींची शाहनिशा देखील झाली होती. यासंदर्भातील सर्व कायदेशीर सोपस्कार देखील पूर्ण करण्यात आले होते. परंतु, गेल्या 1 जानेवारी रोजी झालेली भीमा-कोरेगाव घटना आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहता पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली.