Breaking News

शेतकर्‍यांची फसवणूक करणारे सरकार : शरद पवार

पारनेर : भाजप सरकारने सातत्याने शेतकर्‍यांना दिवास्वप्न दाखत त्यांची अवहेलनाच केली असून, राज्यसरकारने 56 हजार कोटी रूपये माफ केले असते मुख्यमंत्री सांगत असेल तर, हे 56 हजार कोटी रूपये कुठे गेले, असा सवाल राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी उपस्थित केला.


पवार हे माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वासुंदे येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी आ. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, यशवंतराव गडाख उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्याला संबोधित करतांना पवार म्हणाले की, देशाचे प्रश्‍न सोडविण्याचीजवाबदारी ज्या सरकारवर आहे, त्यांचा प्राधान्य शेतकर्‍यांना नसून बडया धनिकांना आहे. बडया धनिकांना वाचविण्यासाठी सरकारने 88 हजार कोटी रूपयांचे अनुदान बँकाना दिले, त्यामुळे या सरकारला शेतकर्‍यांचा विसर पडला आहे. खाणार्‍याचा विचार करणार्‍यापेक्षा पिकवणार्‍याचा विचार केला पाहिजे. मात्र फडणवीस सरकारकडून शेतकर्‍यांना फसविण्याचे काम केले. त्यामुळे आपण सर्वांनी निर्णय घेवून पुन्हा एकदा बळीराजाचे सरकार कसे येईल, याकरिता विचार केला पाहिजे. पारनेर तालुक्यात पाणी कमी असेल, पण स्वाभिमानाने शिक्षणाच्या माध्यमातून आपली मान ताठ ठेवली पाहिजे. या तालुक्यात शिक्षकांची संख्या सगळयात जास्त असल्याचा अभिमान वाटतो. मुंबईसारख्या ठिकाणी स्वर्गीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्यानंतर त्यांचा मुलगा उदय शेळके महाबँकेची जबाबदारी मोठया हिमतीने पुढे नेत असल्याचे गौरवद्गार पवार यांनी यावेळी काढले. या शेतकरी मेळाव्याला आ. अरूण जगताप, राहूल जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अकुंश काकडे आदी उपस्थित होते.