नागपूर : परदेशात वास्तव्यास असलेल्या यवतमाळ येथील एका तरुणाने घरच्यांचा विरोध झुगारून आपल्या मित्राशी समलैंगिक विवाह केला. स्थानिक हॉटेलमध्ये 11 जानेवारी रोजी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भात पहिल्यांदाच झालेल्या अशाप्रकारच्या विवाहामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार यवतमाळ येथील पुस्तक व्यवसायिकाचा उच्चशिक्षीत मुलगा अमेरिकेत वास्तव्याला आहे. त्याला तेथील खासगी कंपनीत बड्या पगाराची नोकरी देखील आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा विषय नाघाला की, तो नकार देत असे. त्यामुळे घरच्यांनी त्याला लग्न न करण्याचे कारण विचारले असता, आपण समलैंगिक विवाह करणार असल्याचे त्याने सांगितले होते. सदर तरुणाचा जोडीदार हा चीनमधील असून दोघेही एकाच कंपनीत नोकरीला आहेत.
विदर्भातील तरुणाचा मित्राशी समलैंगिक विवाह
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:45
Rating: 5