Breaking News

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन उद्दिष्ट पूर्ण -सभापती अनुसया होन


कोपरगाव ता.प्रतिनिधी  – कोपरगाव पंचायत समितीच्या पदाधिका-यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम कारभार करून राष्ट्रीय राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन उद्दिष्ट पूर्ण केले असून शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनाही साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शासनाने दिलेले १०५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून कोपरगाव पंचायत समितीच्या पदाधिका-यांनी आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटविला आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ हा गरजू व्यक्तींनाच मिळाला पाहिजे अशी नेते युवा आशुतोष काळे यांची स्पष्ट भूमिका आहे. या विचारातून सर्व पदाधिकारी काम करीत असल्याचे सांगत समाज कल्याण विभागा मार्फत दिल्या जाणा-या शालेय विद्यार्थिनींना २१५ सायकल व विद्यार्थ्यांना १४१ सायकल मंजूर झाल्या असल्याची माहिती सौ. होन यांनी दिली. तसेच विशेष घटक योजने अंतर्गत राबविल्या जाणा-या दुभत्या जनावरांचे ६ गट कोपरगाव तालुक्यासाठी मंजूर झाले आहेत व एक शेळी गट मंजूर झाला असून लवकरच लाभार्थ्यांना वितरण केले जाणार आहे.

शासनाच्या सर्वच योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा यासाठी युवा नेते आशुतोष काळे सतत प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागाच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदु असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वागीण विकास करण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी यापुढेही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असलयाचे सौ. अनुसया होन यांनी शेवटी म्हटले आहे.