बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्याचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
सांगली, - श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे आयोजित श्री श्री श्री भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्याचे उदघाटन 7 फेब्रुवारी रोजी राष्ट ्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सव राष्ट्रीय समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. या सोहळ्याचा देश- विदेशातील सुमारे 80 लाख जैन समाजबांधव लाभ घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
परमपूज्य 108 आचार्य श्री वर्धमानसागर महाराज यांच्या सान्निध्यात व परमपूज्य स्वस्तिश्री जगदगुरू चारूकीर्ती भट्टारक स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली . 7 ते 25 फेब्रुवारी या क ालावधीत जागतिक कीर्तीचा हा महामस्तकाभिषेक सोहळा होत आहे. या सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व काँग्रेसचे युवा नेते खासदार राहूल गांधी यांना निमंत्रित केले आहे.