नवी मुंबई, मोजो पब आग प्रकरणानंतर शहरातील 40 अनधिकृत हॉटेल्स, पबमधील अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाने सात दिवसांत कारवाई केली. मोजो पब आग प्रकरणानंतर महापालिका क्षेत्रातील 275 हॉटेल/बार/रेस्टॉरंट, लॉजिंग/बोर्डींग, हुक्का पार्लर, पबची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच 40 ठिकाणी निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. तसेच यापूर्वी वाशी येथील हॉटेल ब्रीस्टो मोझोस वर अन धिकृत बांधकामाची तोडक कारवाई करून दंडात्मक रक्कम रु.50 हजार इतकी वसुली करण्यात आलेली आहे. मागील आठवडाभरात आठही विभाग कार्यालय क्षेत्रात बारकाईने पाहणी करण्यात येत असून तपासणी केलेल्या 275 पैकी 97 अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामधील 40 अनधिकृत बांधकामांवर कारवाई क रण्यात आली आहे. सर्वच आठही विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल/बार/रेस्टॉरंट, लॉजिंग/बोर्डींग, हुक्का पार्लर, पब यामधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असलेबाबत काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिकेचा व्यवसाय करणेबाबतचा अधिकृत परवाना आणि मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम आहे काय? याचीही तपासणी करण्यात येत आहे.
शहरातील 40 अनधिकृत हॉटेल्स, पबमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:47
Rating: 5