Breaking News

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

पालघर, दि. 04, जानेवारी - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे जाणार्‍या दोन भरधाव कारच्या समोर अचानक बैल आडवा आल्याने ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळून आंबोली येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नी ठार झाले तर दुस-या कारमधील दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे.


पिंकी शहा (38) आणि चिराग शहा (40, रा. बडोदा) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. शहा दाम्पत्य सोमवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जात होते. याचवेळी आणखी एक कारदेखील या मार्गावरून जात होती. दरम्यान, बैल आडवा आल्याने भरधाव येणार्‍या दोन्ही कारचा ताबा सुटून त्या दुभाजक ावर आदळल्या. यात शहा दाम्पत्य ठार झाले तर दुसर्‍या कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना तलासरी रुग्णालयातून वापी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.