आठ गावांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा
जामखेड /- विजेसाठी जामखेड तालुका लवकरच स्वयंपूर्ण होत आहे. साकतच्या उपकेंद्रामुळे आठ गावांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. जामखेड तालुक्यातील साकत येथे शासनाच्या पायाभूत विकास आराखडा-2 अंतर्गत 33/31 के. व्ही. च्या वीज उपकेंद्राचे उद्घाटन जलसंधारण तथा पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते उत्साहात झाले.
4 एप्रिल 2017 रोजी भूमिपूजन तर 8 जाने 2017 रोजी काम पूर्ण होऊन अवघ्या आठ महिण्यांत हा प्रकल्प पूर्ण केला आहे, यासाठी मा. सभापती भगवान मुरूमकर व माजी सरपंच हनुमंत मूरूमकर यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी रखडलेल्या साकत उपकेंद्रासाठी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे बरोबरीने पाठपुरावा केला होता. ना. राम शिंदे यांच्यामुळेच जामखेड तालुक्यात खांडवी व तरडगाव येथेे दोन उपकेंद्र पूर्ण होऊन यापूर्वीच कार्यान्वित झाली आहेत. साकत उपकेंद्र आजपासून कार्यान्वित झाले आहे, या उपकेंद्रामुळे साकतसह कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कडभनवाडी, मोहा, नानेवाडी, हापटेवाडी, रेडेवाडी या आठ गावांसह जामखेड, साकत परिसरातील 1280 शेतकर्यांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यासाठी साकतचे सरपंच कांतीलाल वराट पं. स. सभापती सुभाष आव्हाड, उप सभापती सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, प्रविण सानप, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात उपनगराध्यक्ष महेश नगरसेवक बिभीषण धनवडे, उपसरपंच दत्ता कोल्हे, ग्रा. स. वाल्मिकी कोल्हे, श्रीराम घोडेस्वार, दादासाहेब वराट, सदाशिव वराट, जालिंदर वराट, गणेश आडसूळ, हरिदास मूरूमकर, हनुमंत वराट, वीज वितरण अधिकारी यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.