ठाणे : कल्याण पूर्वेकडे असलेल्या चिंचपाडा परिसरात एक स्त्री जातीचे नवजात अर्भक जिवंत आढळून आले. सुमंगल रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीच्या झाकणावर या अर्भकाला ठेवण्यात आले. याबाबत स्थानिक कोळसेवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हे अर्भक ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अर्भकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून या अर्भकाचा त्याग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
कल्याणमध्ये आढळले नवजात स्त्री अर्भक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:55
Rating: 5