Breaking News

पुण्यात होणार पहिले शिक्षक साहित्य संमेलन


पुणे, दि. 27, जानेवारी - शहर व जिल्ह्यातील शिक्षकांचे पहिले साहित्य संमेलन पुण्यात 17 व 18 फेब्रुवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. यामध्ये शोभायात्रा, उद्घाटन, परिसंवाद, कवी संमेलन, नाट्य व साहित्यवाचन, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम व समारोप समारंभ असे कार्यक्रम होणार आहे. यामध्ये साहित्यिक शिक्षक ांनी लिहिलेल्या कथा, कविता व अन्य साहित्याची तज्ज्ञांकडून छाननी करुन हे साहित्य प्रकाशित केले जाईल, अशी माहिती पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचे संयोजक व स्वागत अध्यक्ष आमदार विजय काळे यांनी दिली. या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचे संयोजन शनिवारवाडा कला महोत्सव व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात प्रकाशित केल्या जाणार्‍या शिक्षकांच्या कथा, कविता, नाटक व अन्य साहित्य त्यांनी निवडीसाठी सोमवार 5 फेब्रुवारीपर्यंत शिक्षण मंडळ कार्यालय येथे समक्ष किंवा ीहळज्ञीहरज्ञीरहळीूंरीराशश्ररप.लेा येथे स्वतःच्या नाव, पत्त्यासह पाठवावे असे आवाहन विजय काळे यांनी केले आहे. शनिवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता शनिवार पेठेतील महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या निवास स्थानापासून बालगंधर्व रंगमंदिर येथपर्यंत भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक न.म.जोशी शोभा यात्रेची सुरूवात करणार असून त्यामध्ये शेकडो शिक्षक साहित्यिक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता या शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून त्या दिवशी मूल्य शिक्षण काळाची गरजया विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नाट्य व कथावाचन, कवी संमेलन देखील संपन्न होईल. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसर्‍या दिवशी रविवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात ज्ञान-शिक्षण वाद-पारंपारिक शिक्षणाला पर्याय ठरवू शकतो का? या विषयावरती विशेष परिसंवाद होणार असून दुपारी 3.30 वाजता या शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप होईल. या शिक्षक साहित्य संमेलनात 1 हजारहून अधिक शिक्षक साहित्यिक व कवी सहभागी होतील अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली.