महाराष्ट्राला सिंचन व्यवस्थापनासाठीचा प्रथम पुरस्कार
केंद्र शासनाचा हा पुरस्कार प्रथमच महाराष्ट्राला मिळाला आहे. येथील स्कोप कॉम्प्लेक्सच्या सभागृहात केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंग यांच्या हस्ते सिंचन व ऊर्जा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व संस्थांचा विविध श्रेणीत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाचे सचिव यु.पी. सिंह,केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पुष्पेंद्र सिंह, केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र वर्मा मंचावर उपस्थित होते.
