Breaking News

‘रेड्यामुखी वेद बोलविले’च्या घटनेला झाली ७३१ वर्षे पूर्ण! दक्षिण काशीत रंगला भक्तिमय उत्सव


पैठण : प्रतिनिधी  :- ज्ञानराज माउली संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ग्यान्या’ नावाच्या रेड्यामुखी वेद बोलविल्याच्या घटनेला काल { दि. २२ } ७३१ वर्षे पूर्ण झाले. या शुभ पर्वानिमित्त महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दक्षिण काशी श्रीक्षेत्र पैठण नगरीतील प्राचीन नागघाटावर भक्तीमय वातावरणामध्ये एक उत्सव साजरा करण्यात आला. भाविकांनी पहाटेपासूनच गोदावरीत स्नान करुन दगडी रेड्याच्या मूर्तीची विधिवत पुजा करुन दर्शन घेतले. 
शके १२०९ अर्थात इसवी सन १२८७ ला संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवून धर्मन्यायपीठाकडून शुद्धीपञ मिळविले होते. नागघाट या बलस्थान असलेल्या स्थळाला केंद्र सरकार तथा राज्य शासनाने राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी येथील ‘प्रतिसाद’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते बंडेराव जोशी यांनी याप्रसंगी मुखोद्गत असलेल्या ज्ञानेश्वरीच्या जवळपास ४०० ओव्यांचे पठण करुन सर्वांना आपलेसे केले. रमेश खांडेकर, दिनेश पारीक, सागर पाटिल, विष्णू जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. यानिमित्त गावातील नाथमंदीरात प्रविण महाराज गोसावी आणि श्रीनाथ महाराज गोसावी यांचे प्रवचनही झाले. 

या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी संतोष छडीदार, पंडीत बोंबले, मुरली साबळे, सतिष सराफ, गोकुळ वरकड, भालचंद्र बेंद्रे, योगेश साबळे, किरण टेकाळे, एकनाथ धुत, मनोज गुरव, ओम धोकटे, रमेश पाठक, मनोज धोकटे, मिलिंद नाईक, अनिल सराफ, जगन्नाथ जमादार, भिमसिंग बुंदिले, प्रमोद दौंड संतोष कुलकर्णी, ईश्वर दगडे, पंचमदास नागा, शामदास मिश्रा, गोविंद शिंदे, विनोद लोहिया, सुनिल भगत, महादेव गिरणीवाला, संजय जोशी, अच्युतराव पाडळकर, सुर्यकांत रावस, मिलींद नाईक, गणेश देशपांडे, राम आहुजा, तुकाराम बडसल, रतीलाल नागोरी, सुभाष परदेशी आदींनी विशेष परीश्रम घेतले.