Breaking News

प्रसारमाध्यमावरच सर्व भिस्त अवलंबून : ज्येष्ठ अभिनेते पटर्वधन


राहुरी तालुका प्रतिनिधी  :- परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. सारे जग बदलत आहे. विविध क्षेत्रांत बदल होत आहेत. समाजात मोठ्या प्रमाणात बदल होत असताना प्रसारमाध्यमावरच सर्व भिस्त अवलंबून आहे, असे प्रतिपादन मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवि पटर्वधन यांनी केले. राहुरी पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील नूतन सरपंच सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती मनिषा ओहोळ होत्या. 
पटवर्धन यांनी ‘एकच प्याला’ आणि ‘अभी तो मै जवान हूँ’ या कलाकृतीच्या अभिनयातील काही अंश सादर केले.  यावेळी जि. प. सदस्य शिवाजी गाडे, उपसभापती रविंद्र आढाव, कारखान्याचे माजी संचालक उत्तमराव म्हसे, पं. स. सदस्य सुरेश बानकर, बाळासाहेब लटके, सचिन भिंगारदे, सुरेश निमसे, पत्रकार संजय कुलकर्णी, अनिल आढाव, गटविकास अधिकारी इशाधिन शेळकंदे, अविनाश ओहोळ आदी उपस्थित होते. यावेळी शिवाजी गाडे, मुखतार सय्यद, सुनिल भुजाडी, राजेंद्र वाडेकर, संजय कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवागिरे, तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे, शहराध्यक्ष शरद पाचारणे, सचिव मनोज साळवे आदींसह पत्रकार संघाचे सदस्य याप्रसंगी होते. उपसभापती रविंद्र आढाव यांनी प्रास्तविक केले. ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन राजू क्षीरसागर यांनी केले. पंचायत समितीचे सदस्य प्रदीप पवार यांनी आभार मानले.