रत्नागिरीत करसल्लागार संघटनेच्या वेबसाइटचे अनावरण
संघटनेचे सर्व कार्यक्रम मिळून मिसळून केले जातात. यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही. गेल्या वर्षभरात जीएसटी आणि येणार्या अनेक अडचणींवर एकत्र आल्याने मार्ग सापडला. जास्तीत जास्त करसल्लागारांनी सदस्यत्व स्वीकारावे, असे आवाहन इन्स्टिट्यूटचे रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांनी यावेळी केले. या वेळी ज्येष्ठ सीए एच. एल. पटवर्धन, करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष मंदार गाडगीळ उपस्थित होते.
टिळक आळीतील जोशी सभागृहात हा कार्यक्रम झाला. आर्यक सोल्यूशन्सचे प्रशांत आचार्य व ऋषीकेश सरपोतदार यांनी वेबसाइट तयार केली आहे. तिची माहिती या वेळी देण्यात आली. संसारे यांनी सांगितले की, जीएसटी व नवे कर यासंदर्भात संघटनेत चांगली चर्चा घडून येते. वेबसाइटमुळे नोंदणी, प्रश्नोत्तरे सोपे होणार आहे. नवोदित करसल्लागारांनी नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवावेत. यासाठी लागेल ते सहकार्य करू. करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष मंदार गाडगीळ यांनी सांगितले एक वर्षाच्या कालावधीत संघटनेने जिल्ह्यातील करसल्लागारांना एकत्र आणले आहे. नवे कायदे अभ्यासण्यासाठी आपल्याला वेबसाइटचा उपयोग होईल.
