Breaking News

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन


प्रवरानगर प्रतिनिधी  :- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आयोजन करण्यात आले. या दोन्हीही महान व्यक्तींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. प्रवरा परिसरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्येही जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेचे सहसचिव भारत घोगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे शिक्षणसंचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर, बापूसाहेब अनाप, आत्माराम मुठे, एच. आर. मॅनेजर भाऊसाहेब पानसरे, कैलास शिरसाठ, भास्कर घोरपडे, विलास वाणी, एकनाथ सरोदे, शामराव गायकवाड, सुखदेव गुंजाळ, किसन सरोदे, रमेश म्हसे, दीपक विखे, प्रशांत काकड, सुरेश जाधव, सविता तांबे, अरुणा विखे, शकुंतला चौधरी, नसरीन शेख, भरती गाढे, मनीषा मगर, जिजा बच्छाव, अश्विनी मगर, सविता औताडे आदी उपस्थित होते.