प्रत्येक आईमध्ये राजमाता जिजाऊंचे प्रेम आणि वात्सल्य दडलेय : काळे
येथील राजमाता जिजाऊ उद्यानात राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी संस्कार करतांना समाजातील प्रत्येक स्त्रींचा आदर, सन्मान करण्याची शिकवण दिली. समाजातील प्रत्येकाने या शिकवणीची आठवण ठेवत आईने जीवन समृद्ध करण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टाची जाणीव मनात कोरून ठेवली तर महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्याचा उद्देश ख-या अर्थाने सफल होणार आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, जिजाऊ चित्रपटाच्या निर्मात्या मंदा निमसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा कहार, माधवी वाकचौरे, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, अजीज शेख, फकीरमामू कुरेशी, हिरामण कहार, राजेंद्र वाकचौरे, बापू वढने, दिनेश आहेर, मुकुंद इंगळे, संतोष टोरपे, अशोक आव्हाटे, चांदभाई पठान, विशाल निकम, निखिल डांगे आदी उपस्थित होते.
