प्रज्ञा वाळकेंसाठी दिलेल्या पत्रांविषयी आमदारांनी खुलासा करण्याची मागणी
आमदारांची पत्रे बनावट की अपहाराला पाठीशी घालण्याचा अपशकूनी प्रयत्न.
मुंबई/विशेष प्रतिनिधी : मुंबई सार्वजनिक बांधकाम शहर इलाखा विभागात मनोरा एकाच दिवशी वेगवेगळ्या दिनांकाची आवक नोंद झालेली पत्रांबाबत संबंधित आमदारांनी खुलासा करावा अशी मागणी आता पुढे येऊ लागल्याने हे प्रकरण सहजासहजी शांत होण्याची शक्यता धुसर बनली आहे. आमदारांची ही पत्रे संबंधित आमदारांनी दिलेली नाहीत किंवा हे आमदार साबांतील अन्य मंडळींप्रमाणे कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या चर्चित अपहाराशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित असावेत अशी चर्चा साबां वर्तुळात ऐकायला येऊ लागल्याने त्या आठ पत्रधारी आमदारांचा खुलासा या प्रकरणात महत्वाची भुमिका बजावणार आहे.
शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून काम करतांना प्रज्ञा वाळके यांनी केलेली मनमानी कोट्यावधीच्या अपहाराला कारणीभूत ठरली आहे, हे प्रकरण विधीमंडळातही चर्चेला येऊन सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची इभ्रत नागपूरच्या वेशीवर टांगली केली तरी प्रज्ञा वाळके यांच्या अपहाराचे शेपूट अद्यापही वळवळ करीत आहे. प्रज्ञा वाळके यांना साबां मंत्रालय, मुंबई साबां विभागात काम करणारे काही भ्रष्ट मंडळी वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याची शंका व्यक्त केली जात असताना आठ आमदारांच्या पत्राचा मुद्दा ऐरणीवर आल्याने या प्रकरणामागचे रहस्य आणखी गडद झाले आहे.
प्रज्ञा वाळके यांनी वादग्रस्त ठरलेले आमदार कक्षांतील ते काम संबंधित आमदारांच्या सुचनेप्रमाणे केल्याची पत्रे आठ आमदारांनी दिल्याचा पुरावा या अपहाराची चौकशी करणारे साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांना प्राप्त झाल्यानंतर हे प्रकरण वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक केला जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सन 2016 आणि सन 2017 मधील आमदारांची ही पत्रे 19 डिसेंबर 2017 या एकाच दिवशी शहर इलाखा साबां विभागाच्या आवक वहीत नोंद झाल्याचे दिसत असल्याने या पत्रंविषयी शंका व्यक्त होऊ लागली आहे. एकतर ही पत्रे आमदारांच्या नकळत मिळवली गेली असावीत किंवा प्रज्ञा वाळके यांना वाचविण्यासाठी हे आमदारही साबांच्या गोटात सामिल झाले असावेत. अशी चर्चा होऊ लागली आहे. आमदारांचा खुलासा झाल्यानंतरच याविषयीचे तथ्य समोर येऊन या चर्चेवर पडदा पडणार असल्याने आमदारांनी खुलासा करणे पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.
रंगीन रातीची सरबराई शहर इलाखा परगण्यावर चढाईमुंबई शहर इलाखा साबां विभागात काम करण्याची संधी मिळणे म्हणजे उखळ पांढरे पांढरे करण्यास वाव मानला जातो. म्हणूनच या ठिकाणी पोस्टींग होण्यासाठी अभियंता वाट्टेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. संजय इंदूलकर यांनी देखील आपली हयातभराची वरकमाई पणाला लावून नागपूर अधिवेशनाचे औचित्य हेरले आणि ऐन गुलाबी थंडीत रंगीन रातीची उब आफर करून शहर इलाखा साबां परगणा हस्तगत केल्याची चर्चा साबां वर्तूळात ऐकायला येते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये एकत्र आलेले मुंबई साबां प्रादेशिक विभागातील सर्व महनिय, साबां सचिव, साबां मंत्र्याचे सचिव या मंडळींचे गेट टुगेदर आयोजित करून संजय इंदूलकर यांनी या खास पाहूण्यांची रात्रभर सरबराई केल्याचे समजते. दरम्यान चंद्रकांत दादा पाटील यांच्या बदनामीचा निशाणा लावून बसलेल्या मंडळींनी या रंगिल्या रातीच्या सरबराईत नामदारांचेही नाव समाविष्ट केल्याचे समजते. या रंगीन सरबराईची परतफेड म्हणून संजय इंदूलकर यांची शहर इलाखा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून नियूक्ती करण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.