Breaking News

खेडमधील बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला

रत्नागिरी, - मोहाने-ऐनवली (ता. खेड) येथील 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत कुडोशी नदीच्या किनारी आढळून आला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अंकिता सुनील जंगम असे त्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी खेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

अंकिता दोन दिवसांपासून (दि. 28 डिसेंबर) बेपत्ता होती. काल खेड पोलिस ठाण्यात तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आज संशयास्पद स्थितीत तिचा मृतदेह आढळून आल्याने तिच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.