Breaking News

कोरेगाव-भीमासारख्या घटना घडू देऊ नका पंतप्रधानांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश.

नवी दिल्ली : कोरेगाव-भीमासारख्या घटना होऊ देऊ नका, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, की, ‘कोरेगाव-भीमा दंगलीच्या सूत्रधारांचा बिमोड करा. जातीय विद्वेष रोखा. समाजात फुट पाडणार्‍यांना धडा शिकवा,’ असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत. 


या घटना समाजात तेढ निर्माण करणार्‍या, फूट पाडणार्‍या आहेत. परंतु संघ आणि भाजप काहीही अघटित घडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणार्‍या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील परिसरात अचानकपणे काही समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक केली होती. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले.