Breaking News

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात संत साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन


श्रीगोंदा/प्रतिनिधी/- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत साहित्य परंपरा व संतांचे साहित्य या विषयावर दि. २ व ३ फेबुवारी २०१८ रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे तसेच इतिहास विषयाचेही राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली.
या चर्चासत्राच्या उदघाटन संमारंभाचे अध्यक्षस्थान माजी आदिवासी विकास मंत्री मा. बबनराव पाचपुते भूषविणार  आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बीजभाषण ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे तसेच दिल्लीचे डॉ. कृष्णकुमार कौशिक हे करणार आहेत. या चर्चासत्रात मराठी व हिंदी संत साहित्याचे अभ्यासक शोधनिबंध सादर करणार आहेत. राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रा. नारायण हिरडे, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. देवेंद्र बहिरम, डॉ. योगिता  रांधवणे, प्रा. रमेश थोरात , प्रा. सुप्रिया पवार व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर सेवक परिश्रम घेत आहेत