Breaking News

अन्न व औषध प्रशानाकडून दुधाचे नमुने घेण्याची कार्यवाही

नाशिक, दि. 25, जानेवारी - ग्राहकांना सुरक्षित दुध उपलब्ध होण्अन्न व औषध प्रशासनाकडून नाशिक विभागातील दुध संकलन केंद्र, दुध प्रक्रीया केंद्र, वितरक आणि किरक ोळ विक्रेत्यांच्या स्तरावर दुधाचे नमुने घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

दुधाची भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. नाशिक विभागात 131 नमुने घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधितांवर अहवालाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार आहे. मागील वर्षी 302 दुधाचे नमुने घेण्यात आले होते आणि त्यापैकी 84 कमी दर्जाचे घोषित झाले. एकाही नमुन्यात आरोग्यास हानीकारक भेसळ आढळून आली नाही. गेल्या दोन वर्षात कमी दर्जाच्या 76 नमुन्याप्रकरणी 19 लाख 48 हजार रुपये दंड करण्यात आला, अशी माहिती सहआयुक्त उ.शं. वंजारी यांनी दिली आहे.