पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून इस्रोचे अभिनंदन केले. ट्विट करत ते म्हणाले, ‘पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रो आणि त्यांच्या शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन. नवीन वर्षातील हे पहिलेच यश. देशाच्या तंत्रज्ञानाला आणखी भरारी देईल. हे तंत्रज्ञान सामान्य नागरिक, शेतकरी, मच्छिमार यांना सहाय्यक होईल. इस्रोच्या 100व्या उपग्रहाचं प्रक्षेपण ही आपल्यासाठी उत्तुंग भरारी आहे. यातून भारताच्या भविष्यातील अवकाश तंत्रज्ञानाची वाटचाल घडेल.भारताच्या यशाचे फायदे आमच्या सगळ्या मित्रांना सारखे मिळतील, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
पंतप्रधानांकडून इस्त्रोचे अभिनंदन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:57
Rating: 5