Breaking News

पेन्शनधारकांचे दि. २१ फेब्रुवारीला रामलीला मैदानावर धरणे आंदोलन


श्रीरामपूर प्रतिनिधी :- पेन्शनवाढ मिळावी, खा. भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशी अंमलबजावणी करावी, सेवानिवृत्तांना दर्जेदार आदींसह अन्य मागण्यांसाठी देशातील प्रमुख चार पेन्शनर्स संघटना एकत्र येऊन २१ फेब्रुवारी रोजी नवीदिल्ली येथे रामलीला मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्यावतीने देण्यात आला. यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मोफत वैद्यकीय सुविधा द्यावी, अन्नसुरक्षा कायदा लागू करावा, १९९५ च्या कायद्यात बदल करून सूत्रात बदल करावा, उद्योग धंदा बंद पडल्यास अथवा वयाच्या ५८ पूर्वी निवृत्ती घेतलेल्या सर्वांना पूर्ण पेन्शन द्यावी. दि. २४ सप्टेंबर २००९ नंतर निवृत्त झालेल्या कामगारांना दोन वर्षे वेटेज आदी लाभ मिळावेत.